शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:31 IST

कराड खुनाच्या गुन्ह्यात अगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस का लावले? हा प्रश्न आहे.

बीड : वाल्मीक कराड याची २०१४ पासून संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे. तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झाले आहे. कराड हा गुंड असल्याचे माहिती असतानाही बीड पोलिसांकडून दोन कर्मचारी देऊन कराडलाच संरक्षण देत होते, हे उघड झाले आहे. गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलिस नव्या वादात सापडले आहेत.

सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना गोल्डे यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी जबाब दिला होता. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला सीआयडीने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ जानेवारी रोजी कराड समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला. त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर केले. यावेळी काही लोकांनी हातात दगड घेत गोंधळ घातला होता. परंतु आपण परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा गोल्डेंनी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता, असे गाेल्डे यांनी जबाबात म्हटले आहे.

कराडच्या सुरक्षेसाठी बीड पोलिस तैनातकराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवले. परंतु त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात पोलिस मुख्यालयातील १८ अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी ठेवले होते. तसेच २२ जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना ६ अधिकारी, ३३ पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते, असे गोल्डे यांनी म्हटले आहे.

गोल्डेंच्या या वाक्याने संभ्रम वाढला९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. याच गुन्ह्यात वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतु तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. साधारण १५ दिवसानंतर कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केले होते. गोल्डे यांच्या या जबाबामुळे संभ्रम आणि नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कराड खुनाच्या गुन्ह्यात अगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस का लावले? हा प्रश्न आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या