रस्त्यावर साचले तळे, गुलाल, फुले उधळून गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:56+5:302021-07-19T04:21:56+5:30
आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रस्त्यावर डोंगरगण गावाला लागूनच मधोमध एक मोठा खड्डा असल्याने पाऊस होताच तो खड्डा भरला जातो. ...

रस्त्यावर साचले तळे, गुलाल, फुले उधळून गांधीगिरी
आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रस्त्यावर डोंगरगण गावाला लागूनच मधोमध एक मोठा खड्डा असल्याने पाऊस होताच तो खड्डा भरला जातो. मग दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक जण दुचाकीवर घसरूनदेखील पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी करूनदेखील त्याची कसलीच विल्हेवाट लावली जात नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात जर एखादी घटना घडली तर संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच लवकरात लवकर हा अडचण करणारा खड्डा बुजून गैरसोय दूर केली नाही तर उपोषणास बसणार असल्याचा इशारा मयूर चव्हाण, दत्ता चव्हाण, रामदास चव्हाण, रवी पवार, गणेश हारकर, कुमार पवार, महंमद शेख, परमेश्वर कर्डिले, बाळू कुऱ्हाडे यांनी दिला आहे.
180721\20210718_095055_14.jpg