गांधीगिरी टळली, ग्रामसेवक ताळ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:02+5:302021-02-05T08:22:02+5:30
लोकमत इम्पॅक्ट माजलगाव : तालुक्यातील भाटवडगाव येथील विश्वकर्मा मंदिर परिसरात घाण पाण्यामुळे मंदिरात जाणे अवघड झाले होते. याबाबतचे वृत्त ...

गांधीगिरी टळली, ग्रामसेवक ताळ्यावर
लोकमत इम्पॅक्ट
माजलगाव
: तालुक्यातील भाटवडगाव येथील विश्वकर्मा मंदिर परिसरात घाण पाण्यामुळे मंदिरात जाणे अवघड झाले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच येथील ग्रामपंचायतने मंदिर परिसरात येणारे पाणी दुसरीकडे काढून दिल्यानंतर आता भक्तांना मंदिरात जाणे सुलभ झाले आहे.
माजलगाव शहरालगत असलेल्या भाटवडगाव येथे विश्वकर्मा मंदिर असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात; परंतु येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे या गावातील नाल्यांचे घाणपाणी या मंदिराजवळ साचत होते. यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात हिरवेगार पाणी साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामसेवकाला सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे या भागातील महिलांनी ग्रामसेवकाचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत रविवारी लोकमतमध्ये ‘ग्रामसेवक असमर्थ ठरला तर होणार सत्कार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने जेसीबीद्वारे मंदिराच्या ठिकाणी येणारे घाण पाणी थांबवले. विश्वकर्मा मंदिर परिसरात येणारे घाण पाणी थांबल्यानंतर भाविकांना मंदिरात जाता येऊ लागले असून, या परिसरातील दुर्गंधी कमी झाली आहे.