गेवराई शहरात गल्लोगल्ली आठवडी बाजार भरला; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:32+5:302021-06-03T04:24:32+5:30

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघत असल्याने व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १ जून ते १५ ...

The Gallogalli weekly market filled the city of Gevrai; Violation of corona rules | गेवराई शहरात गल्लोगल्ली आठवडी बाजार भरला; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

गेवराई शहरात गल्लोगल्ली आठवडी बाजार भरला; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण निघत असल्याने व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १ जून ते १५ जूनपर्यंत जिल्ह्यात लाॅकडाऊन लावला. यात फक्त औषधी, दवाखाने यांना पूर्ण वेळ, तर फळविक्रेते, भाजी विक्रेते तसेच किराणा यांना फक्त सकाळी ७ ते ११ पर्यंत मुभा देण्यात आली. यात कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आदेश असतानाही व बुधवार रोजी शहरातील आठवडी बाजार बंदचे आदेश असतानाही नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातील कोल्हेर रोड, नाईक नगर, मोढा नाका, ताकडगाव रोड, सावतानगरसह विविध भागांत भाजी विक्रेते, फळविक्रेतेसह अनेकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने लावून रस्त्यावर बसले. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. यात कोरोना नियमांचे पालन कोठेत दिसत नव्हते. त्यामुळे यात कोरोना रुग्ण वाढल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आम्ही जास्त भाजी विक्रेते बसू नये यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून विविध ठिकाणी बसलो. मात्र एकीकडे भाजी विक्रेते हटवायला गेलो तर दुसरीकडे ते येऊन बसत आहेत. तरी देखील आम्ही सर्वांना हटविले होते.

उमेश ढाकणे, गेवराई न.प. मुख्याधिकारी

===Photopath===

020621\20210602_115555_14.jpg

Web Title: The Gallogalli weekly market filled the city of Gevrai; Violation of corona rules