युसूफवडगाव येथे गजानन महाराज प्रकटदिन साजरा- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:12+5:302021-03-07T04:30:12+5:30
केज : तालुक्यातील युसूफवडगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ह. भ. प. ...

युसूफवडगाव येथे गजानन महाराज प्रकटदिन साजरा- A
केज : तालुक्यातील युसूफवडगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ह. भ. प. भगवानबाबा मोरे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
कळंब - अंबाजोगाई रस्त्यावरील युसूफवडगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ह. भ. प. भगवानबाबा मोरे महाराज यांचे भाविकांसाठी कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी महाराजांनी उपस्थितांना परमार्थ करण्याचे आवाहन केले. कोरोनाचे संकट अजूनही गेले नसल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी, तोंडाला मास्क व सॅनिटायझर यांंचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रामभाऊ चोपणे, शिवरूद्र चोपणे, भाऊ चोपणे, बाबू शिंदे, गणेश कोरसळे, शिवकुमार कोरसळे, राजू कोरसळे, सूर्यकांत थळकरी, गणपत लामतुरे यांनी परिश्रम घेतले.