लाच स्वीकारताना ‘महावितरण’चा उपव्यवस्थापक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:21+5:302021-07-07T04:42:21+5:30
बेडेकर याच्याकडे एका प्रकरणाची चौकशी सुरू होती. दरम्यान, त्या चौकशी अहवालात सहकार्य करण्यासाठी बेडेकर याने १ जून रोजी ...

लाच स्वीकारताना ‘महावितरण’चा उपव्यवस्थापक गजाआड
बेडेकर याच्याकडे एका प्रकरणाची चौकशी सुरू होती. दरम्यान, त्या चौकशी अहवालात सहकार्य करण्यासाठी बेडेकर याने १ जून रोजी ११ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर १० हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक मारुती पंडित, उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रवींद्र परदेशी, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भारत गारवे, चालक मोरे यांनी केली.
...तर तक्रार करावी
कोणत्याही स्वरूपाच्या कामासाठी लाचेची मागणी केल्यानंतर, याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास करावी, असे आवाहन उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांनी केले आहे.