उसन्या पैशावरून गजाने डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST2021-09-06T04:38:09+5:302021-09-06T04:38:09+5:30

... वकिलास मारहाण करून लुटले अंबाजोगाई : अर्वाच्य शिवीगाळ करून वकिलास मारहाण करून एक तोळ्याचे लॉकेट व ६७ ...

Gaja broke his head with the borrowed money | उसन्या पैशावरून गजाने डोके फोडले

उसन्या पैशावरून गजाने डोके फोडले

...

वकिलास मारहाण करून लुटले

अंबाजोगाई : अर्वाच्य शिवीगाळ करून वकिलास मारहाण करून एक तोळ्याचे लॉकेट व ६७ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले. ही घटना ३ सप्टेंबर रोजी येथील परळी रोडवर घडली. बाळासाहेब लाड (रा. लाडेवडगाव ता. केज) असे त्या वकिलाचे नाव आहे. विलास कुंडलिक घुगे याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

मारहाण करून मोबाइल हिसकावला

परळी : येथील शिवाजीनगर भागात दर्शनासाठी मंदिरात निघालेल्या सोमीनाथ दगडू कांबळे (३७, रा. अशाेकनगर, परळी) यांना मारहाण करून मोबाइल हिसकावल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. विनाकारण का मारता, असे म्हटल्यानंतर तू माझा मोबाइल चोरलास का, असे म्हणत मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संभाजीनगर ठाण्यात अज्ञात चौघांवर गुन्हा नोंद झाला.

....

Web Title: Gaja broke his head with the borrowed money