पूसच्या जिल्हा परिषद शाळेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:45+5:302021-03-23T04:35:45+5:30
शाळेची इमारत अतिशय जीर्ण व जुनी झाल्याने नवीन इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट ...

पूसच्या जिल्हा परिषद शाळेसाठी ७५ लाख रुपयांचा निधी
शाळेची इमारत अतिशय जीर्ण व जुनी झाल्याने नवीन इमारतीच्या बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन शाळेच्या बांधकामासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या नवीन इमारतीचे भूमिपूजन शिवाजी सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी गावचे सरपंच वसंतराव देशमुख, पंचायत समिती सदस्य रखमाजी सावंत, जयवंतराव देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक कचरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बप्पासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण कचरे, धनंजय शिंदे, बाळासाहेब देशमुख, श्रीराम पवार, बळवंत बावणे, शिवाजी घोलप, धनराज गायके, बंटी उदार, महादेव हाके, सोमनाथ उदार, दत्ता जाधव, राजाभाऊ उदार यांची उपस्थिती होती.
यावेळी शिवाजी सिरसाट म्हणाले, शाळेच्या इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठपुरावा करून सहा वर्गखोल्या, स्वच्छतागृहाची इमारत, सरंक्षण भिंत, आदी कामांसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिवाजी सिरसाट यांनी दिले.
शाळेचे रूप पालटले
पूस जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून अशोक कचरे यांची निवड झाल्यानंतर शाळेची गुणवत्ता वाढली. शाळेच्या विकासासाठी अशोक कचरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला. आगामी काळात ही शाळा दर्जेदार शिक्षणासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मुख्य केंद्र ठरावे, अशी अपेक्षा शिवाजी सिरसाट यांनी यावेळी व्यक्त केली.
===Photopath===
220321\avinash mudegaonkar_img-20210320-wa0051_14.jpg