खून करणाऱ्या भावासह मित्राला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:36 IST2021-04-28T04:36:58+5:302021-04-28T04:36:58+5:30

केज : तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा खून करून फरार झालेल्या भावाला व त्याच्या मित्राला केज पोलिसांनी ...

Friend with murdered brother to police custody | खून करणाऱ्या भावासह मित्राला पोलीस कोठडी

खून करणाऱ्या भावासह मित्राला पोलीस कोठडी

केज : तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा खून करून फरार झालेल्या भावाला व त्याच्या मित्राला केज पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन

दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.

केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यासाठी शितल लक्ष्मण चौधरी ( २८ ) या त्यांच्या मुलीस घेऊन आल्या होत्या. दरम्यान २० एप्रिल रोजी त्यांच्या डोक्यात तिक्ष्ण हत्याराने हल्ला करून झोपेतच खून केला होता. याप्रकरणी त्यांचा भाऊ दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून ते फरार होते केज पोलिसांनी त्यांना सोमवारी ताब्यात घेतले. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असतात न्यायालयाने दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Friend with murdered brother to police custody