शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

बीडमधील स्वातंत्र्यसैनिक बोगस प्रमाणपत्र प्रकरण; मलेरीया विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:48 AM

या विभागात वर्ग ३ चे सहा कर्मचारी असून त्यांना नोटीस बजावून खुलासे मागविले आहेत.

ठळक मुद्देन्यायालयाने ही बाब गंभीर असून अधिकाऱ्यांनीच आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले. वर्ग ४ चे १७ कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते.

- सोमनाथ खताळ

बीड :  स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू आहे. जिल्हा रूग्णालया पाठोपाठ आता मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. या विभागात वर्ग ३ चे सहा कर्मचारी असून त्यांना नोटीस बजावून खुलासे मागविले आहेत. येत्या तीन दिवसांत त्यांच्यावर बडतर्फच्या कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसतानाही खोटी कागदपत्रांच्या आधारे  स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण  बीड जिल्ह्यात समोर आले होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानंतर हे कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने ही बाब गंभीर असून अधिकाऱ्यांनीच आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा रूग्णालयाच्या अस्थापनेवरील वर्ग ३ च्या ३ कर्मचाऱ्यांवर लातुरच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक माले यांनी आणि वर्ग ४ चे १७ कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

आता जिल्हा रूग्णालया पाठोपाठ मलेरिया विभागातीलही सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासेही मागविले आहेत. काहींनी खुलासेही दिल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्यावरही बडतर्फची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नायगावला झाली बैठककारवाईच्या रडारवर असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नायगाव येथे गोपनिय बैठक झाली आहे. यामध्ये पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात आणि कारवाईपासून बचाव करण्यासाठी काय करायला पाहिजे, याबाबत चांगलीच ‘प्लॅनिंंग’ झाल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. 

कारवाईस दिरंगाई का?आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी न्यायालयाचे आदेश येताच आणि प्रकरण गंभीर असल्याने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. मात्र मलेरिया विभागाकडून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई का केली जात आहे? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे नावाखाली कारवाईस उशिर केला जात असल्याचेही आरोग्य विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात ‘तडजोड’ झाल्याचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याला पुर्णविराम देण्याासाठी दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे.

दोन ते तीन दिवसात कारवाई मलेरिया विभागात सहा कर्मचारी आहेत. त्यांना नोटीस बजावल्या आहेत. काहींनी खुलासेही दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.डॉ.कमलाकर आंधळे, जिल्हा हिवताप अधिकारी, बीड

टॅग्स :fraudधोकेबाजीBeedबीडsuspensionनिलंबन