बीडमध्ये थॅलेसेमिया, हिमोफिलिया रुग्णांची मोफत तपासणी - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:24+5:302021-01-08T05:50:24+5:30
जिल्हा आरोग्य विभाग व परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. थॅलेसेमिया मेजर हा रक्तातील ...

बीडमध्ये थॅलेसेमिया, हिमोफिलिया रुग्णांची मोफत तपासणी - फोटो
जिल्हा आरोग्य विभाग व परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. थॅलेसेमिया मेजर हा रक्तातील आनुवंशिक गंभीर आजार रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची लस अथवा औषध नाही. आजार झल्यानंतर एक वर्षाच्या आत बालकाला हा आजार असल्याचे लक्षात येते. त्यामुळे जनजागृती हाच यावर एकमेव पर्याय आहे. हाच धागा पकडून परभणी येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मोफत तपासणी व उपचार पद्धती सुरू केली. बीडमध्येही या आजाराचे रुग्ण आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही मोफत शिबिर घेण्याचे नियोजन केले आहे. सर्व थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदींनी केले आहे. नावनोंदणीसाठी पिंपळगावकर, डॉ. जयश्री बांगर, डॉ. रेश्मा मोकाशे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
याठिकाणी होणार शिबिर
गेवराई, माजलगाव, वडवणी, आष्टी, पाटोदा शिरूर व बीड तालुक्यांतील रुग्णांसाठी २२ जानेवारी रोजी आदित्य वैद्यकीय महाविद्यालयात हे शिबिर होणार असून, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. तुषार इधाते (औरंगाबाद) हे तपासणी करणार आहेत, तर परळी, धारूर, अंबाजोगाई व केज मधील रुग्णांसाठी स्वा.रा.ती. ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे २३ जानेवारी रोजी आयोजित केले असून, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. मनोज तोष्णीवाल (औरंगाबाद) हे तपासणी करणार आहेत, तसेच यापुढेही नियमित रक्त व औषधपुरवठा केला जाणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून हे उपचार मोफत केले जाणार आहेत.