ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाल्याचे सांगत ७१ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:42+5:302021-03-22T04:30:42+5:30
बीड : एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे, असे म्हणत अर्जदाराकडून ...

ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाल्याचे सांगत ७१ हजारांची फसवणूक
बीड : एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे, असे म्हणत अर्जदाराकडून टप्प्याटप्प्याने ७१ हजार रुपये ऑनलाइन प्राप्त करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार धारूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी धारूर पोलिसात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथील सुनील चित्रसेन रिड्डे यांनी एसबीआय ग्राहक सेवा केंद्रासाठी डिसेंबर २०२० ला अर्ज केला होता. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी तुम्हाला एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी भामट्याने तुम्ही नोंदणीसाठी १५ हजार ६०० रुपये पेटीएम करा असे म्हणल्यानंतर अर्जदाराने ग्राहक सेवा केंद्र आपल्याला मिळणार या हेतूने भामट्याला १५ हजार ६०० रुपये पेटीएम केले. त्यानंतर दि.२१ जानेवारी ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान त्या भामट्याने अर्जदाराला वेळोवेळी पैशांची मागणी केली. अर्जदाराने भामट्याच्या इंडस्ट्रीयल बँक अकाऊंट नंबर १५९५३६०२७४२२ व कॅनरा बँक अकाऊंट नं.४९५६१०१००५५६६ या अकाऊंटवर ७० हजार ९०० रुपये पाठवले. मात्र त्यानंतर अजून पैशांची मागणी होऊ लागली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुनील रिड्डे यांनी धारूर पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. यावरून भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.