शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वीट भट्टी चालकास लाचेची मागणी करणारे चार पोलिस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:39 PM

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची कारवाई

परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवनावश्यक वस्तूंचे व्यावसाय सोडून इतरांना परवानगी नाही. मात्र, ‘तुमची वीटभट्टी सुरु कशी’ असे म्हणत दमदाटी करून वीटभट्टी चालकाकडून लाचेची मागणी करणाऱ्या चार पोलीस शिपायांचे निलंबन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली. 

परळी तालुक्यातील सारडगाव येथील येथील विटभट्टीवर १८ एप्रिल रोजी रात्र गस्तीवर असलेले परळी ग्रामीण ठाण्याचे पोलीस शिपाई एस.बी चिंदमवार, जी.ए.येरडलावार, एस.एन एकुलवार, पी.एस पांचाळ  हे गेले होते. यावेळी वीटभट्टीवर सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी मजूर झोपलेले होते. ही वीटभट्टी सुरु असल्याचे सांगून, तुमच्यावर कारवाई करू असे म्हणत वीटभट्टी मालक मधुकर डोळे यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान १० हजार रुपये घेऊन तेथून चौघे पोलीस शिपाई  निघून गेले. यावेळी त्यांनी मजुरांना मारहाण केली होती. 

याप्रकरणी मधुकर डोळे यांनी पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्याकडे चारही लाचखोर पोलिसांची तक्रार केली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी चौकशी करून अहवाल पोलीस अधीक्षक कायालर्यात पाठवला. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व तपासणी करून २२ एप्रिल रोजी पोलीस शिपाई, एस.बी.चिंदमवार, जी.ए. येरडलावार, एस.एन एकुलवार, पी.एस.पांचाळ यांना निलंबित केले. 

आमदार संजय दौंड यांनी घेतली दखलवीटभट्टीचालक मधुकर डोळे यांनी घडलेला सर्व प्रकार आ. संजय दौंड यांच्या कानावर घातला होता. त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे याची दखल घेत तात्काळ कारवाई करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण