परळीत पाचपैकी चार नवे चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:45 IST2018-01-23T00:44:58+5:302018-01-23T00:45:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : येथील राकाँच्या ताब्यातील नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी न.प.सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात ...

परळीत पाचपैकी चार नवे चेहरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील राकाँच्या ताब्यातील नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी न.प.सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली. यावेळी सभापतींची बिनविरोध निवड झाली. सर्व सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदी प्राजक्ता श्रीकृष्ण कराड, स्वच्छता समितीच्या सभापतीपदी विजय भोयटे, बांधकाम सभापतीपदी रहेनाबी शेख शरीफ, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मीना पांडुरंग गायकवाड यांची वर्णी लागली आहे. उपसभापतीपदी कुसुम कुकर यांची निवड करण्यात आली, तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी गोपाळ आंधळे यांची फेरनिवड झाली.
स्थायी समितीच्या सदस्यपदी माजी नगराध्यक्ष बाजीराज धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड, माजी उपनराध्यक्ष शकील कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये पाचपैकी चार नव्या चेहºयांना संधी मिळाली आहे.
पीठासीन अधिकारी म्हणून गणेश महाडिक यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी शरद झाडगे, नगराध्यक्षा सरोजिनी सोमनाथअप्पा हालगे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, उपनराध्यक्ष अयुब पठाण,माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी वाल्मिक कराड आदींची उपस्थिती होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले.