शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद 
2
"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल
3
ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा
4
क्रूरतेचा कळस! रुग्णाला फरफटत नेलं अन् बेदम मारलं; रिहॅबिलिटेशन सेंटरमधील भयंकर घटना
5
'डॉन ३'मध्ये कियाराच्या जागी दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री , रणवीरची 'जंगली बिल्ली' बनणार
6
देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस
7
अवघ्या ११२ धावांचा पाठलाग न जमल्याने KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे निराश, म्हणाला...  
8
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹२,००,००० ची FD केली तर २ वर्षानंतर किती रक्कम मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
9
TCS कंपनीला अवघ्या ९९ पैशांत २१.१६ एकर जमीन! 'या' राज्याच्या सरकारचा मोठा निर्णय
10
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील स्टँडला दिलं जाणार रोहित शर्माचं नाव; आणखी २ दिग्गजांची नावेही जाहीर
11
राज्यात पुन्हा एक शिक्षक भरती घोटाळा उघड; बनावट ठरावावरून दोन शिक्षकांना नियुक्ती
12
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
13
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५ लाख, मिळेल ₹२,२४,९७४ चं फिक्स व्याज; पाहा डिटेल्स
15
पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून २१ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण, का मिळाला दिलासा?
16
राज्यातील २० ‘आयटीआय’मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार; १५ दिवसांचे प्रशिक्षण मोफत
17
"मला ट्रेनमध्ये चुकीच्या पद्धतीने स्पर्श...", १४ वर्षांचा असताना टीव्ही अभिनेत्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार
18
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
19
मुंबई: चार दिवसांत बघता येणार तब्बल ४१ मराठी चित्रपट, तेही फुकट; कोणत्या चित्रपटांचा समावेश?
20
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील

अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:24 IST

शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे.

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (बीड) : शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. उत्खनन सुरू असतांना नवीन मंदिराची रंगशिळा निघाली तर अनेक दुर्मिळ मूर्तींसह नवनवीन अवशेष हाती लागू लागले आहेत. 

११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयच्या वतीने १८ मार्चपासून उत्खननाचे काम सुरू झाले आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूने उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन सुरू होताच उत्तर बाजूला नवे मंदिर सापडले. ढिगाऱ्याखाली दडलेल्या या मंदिराची मोठी रंगशिळा पायाभागात निघाली तर द्वारशाखेच्या बाजूला असणारी एक विष्णूची पुरातन सुंदर अशी मूर्ती सापडली आहे. तसेच चुन्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे भाग, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच  घडविलेल्या विटा, अशा अनेक दुर्मिळ वस्तू उत्खननातून निघाल्या आहेत. तर दक्षिण-पश्चिम बाजूस झालेल्या उत्खननात दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या. या पायऱ्यांवर गजधर आढळून आलेला आहे. तर मंदिराच्या पूर्वेकडे समोरील बाजूस मोठे कुंड असून या कुंडाचे खोदकामही होणार आहे. पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी यांचे पथक अंबाजोगाईत तळ ठोकून आहेत. यात तंत्रसहाय्यक, निलिमा मार्केडे, पुरातत्व समन्वयक मयुरेश खडके, स्नेहाली खडके, कामाजी डक, मुश्रीफ पठाण, सर्वेक्षक प्रल्हाद सोनकांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. 

तीन मंदिरांची शृंखलासंकलेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननाचे काम सुरू झाल्यानंतर एक नवीन मंदिर उत्खननातून पुढे आले. सध्या असलेल्या संकलेश्वर मंदिराच्या उत्तर बाजूस दोन्ही मंदिरे असावीत असा अंदाज पुरातत्व खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवमंदिराच्या बाजूला तीन मंदिरे असल्याचा शोध ठिकठिकाणी लागलेला आहे. याही ठिकाणी तीन मंदिरांची शृंखला  असावी असा अंदाज वर्तवून उत्खननाचे काम सुरूच आहे. 

‘त्या’ ७० ते ८० मुर्त्या सुरक्षितदीड वर्षापूर्वी अंबाजोगाई येथील काही हौसी नागरिकांनी संकलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवितांना जेसीबीच्या सहाय्याने मंदिर परिसरातील मुर्त्या हलविल्या या प्रकारामुळे मुर्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही घटना पुरातत्व खात्याला कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी  दखल घेऊन त्या मुर्त्या सुरक्षित स्थळी हलविल्या.आता पुरातत्व विभागाने तयार केलेल्या नवीन शेडमध्ये त्या मुर्त्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्या सर्व मुर्त्या सुरसुंदरी,साधक, विष्णू, शिव यांच्या असून बऱ्याच मुर्त्यांची झीज झाल्याने त्या ओळखता येत नाहीत. मात्र, या सर्व मुर्त्यांवर दक्षिणात्य शिल्प शैलीचा प्रभाव दिसून येतो. 

टॅग्स :AmbajogaiअंबाजोगाईTempleमंदिरExcavationउत्खननArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबाद