बीडच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोभाताई पिंगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2022 19:29 IST2022-09-02T19:28:58+5:302022-09-02T19:29:17+5:30

धारूर तालुक्यातील आसरडोह जिल्हा परिषद गटातून निवडून येत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.

Former Zilla Parishad President of Beed Sobhatai Pingle passed away | बीडच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोभाताई पिंगळे यांचे निधन

बीडच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोभाताई पिंगळे यांचे निधन

धारूर ( बीड) :  बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोभाताई भारतराव पिंगळे ( 55 )  यांचे आज अंबाजोगाई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

धारूर तालुक्यातील आसरडोह जिल्हा परिषद गटातून शोभाताई भारतराव पिंगळे २००८ साली निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी राजकीय पटलावर ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.
 

Web Title: Former Zilla Parishad President of Beed Sobhatai Pingle passed away

टॅग्स :Beedबीड