शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कला केंद्रातील वेश्या व्यवसायप्रकरणी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:50 IST

चौथा आरोपी रत्नाकर शिंदे फरार : पोलिस तपास अद्यापही सुरू

केज : तालुक्यातील उमरी शिवारात चालणाऱ्या महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रावर कलेच्या नावाखाली इतर जिल्ह्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या प्रकरणात तपासानंतर आरोपींच्या यादीत उद्धवसेनाचा तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याचे नाव चौथा आरोपी म्हणून घेतले आहे.

बीड येथील पोलिस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पथकासह केज तालुक्यातील उमरी शिवारातील महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र परिसरात सापळा लावून व बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. या ग्राहकाने काम झाल्याचा इशारा करताच पथकाने छापा मारून कला केंद्राच्या मॅनेजरला बनावट ग्राहकाने दिलेल्या पाच हजार रुपयांसह जेरबंद केले होते.

सपोनि. मधुसूदन घुगे यांच्या फिर्यादीवरून सत्त्वशीला बाबासाहेब अंधारे (वय ४३), आदित्य सत्त्वशीला अंधारे (वय २२, दोघी रा. स्वरसंगम कॉलनी, बीड ह मु. सावंतवाडी ता केज) व मयूर बाबूराव अंधारे (वय ३५, रा. उदयनगर, धारूर) या तिघांविरुद्ध केज पोलिसांत २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गुन्हा नोंद झाला होता.

पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी तपास केल्यानंतर त्यांनी आरोपींच्या यादीत उद्धवसेनेचा तत्कालीन जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याचे नाव चौथा आरोपी म्हणून घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, रत्नाकर शिंदे अद्याप फरार असल्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही, अशी माहिती तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

यांनी केली होती कारवाई..ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाचे सपोनि मधुसूदन घुगे, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलिस नाईक बहिरवाळ, शिंदे, शुभम घुले, महिला पोलिस अर्चना वंजारे, भाग्यश्री खांडेकर यांनी केली होती.

दहा महिलांची केली होती सुटका..कारवाई करणाऱ्या पथकाने या कला केंद्रावर कला सादर करण्याच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दहा पीडित महिलांची सुटका केली होती. यावेळी निरोधचे १४ पाकिटे जप्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या