शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावच्या माजी नगराध्यक्षांचा प्रताप; खोटी कागदपत्र तयार करून हडपला बहिणीचा प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:32 IST

अशोक होके, त्यांची पत्नी आणि नगरपालिकेच्या तत्कालीन तीन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

माजलगाव (बीड) : येथील माजी नगराध्यक्ष अशोक होके यांना कुठलीही रजिस्ट्री व हक्क सोडत दिलेली नसताना बहिणीच्या नावे असलेला प्लॉट नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून पत्नीच्या नावावर करून दिला होता. याप्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष अशोक होके, त्यांची पत्नी उज्वला होके व नगरपालिकेचे तत्कालीन तीन कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगाव शहरातील सर्वे नंबर 374 मधील प्लॉट नंबर 27 हा शारदाबाई नारायणराव सोळंके यांनी 26 ऑगस्ट 1987 रोजी खरेदी केला होता. खरेदी नंतर नगरपालिकेत नियमानुसार नोंद घेतल्यानंतर त्याच्या अनेक वेळा पीटीआर देखील घेतली होती. 2011 साली शारदाबाई यांचे पती नारायणराव सोळंके हे सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे पती नारायणराव सोळंके हे पीटीआर घेण्यासाठी गेले असता येथील 374 सर्वे नंबरमधील प्लॉट नंबर 27 हा उज्वला होके यांच्या नावे 2008 साली करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

हा प्लॉटवर कोणत्या आधारावर नाव लावण्यात आले याची माहिती मिळत नसल्यामुळे  माहितीच्या अधिकारात सोळंके दांपत्यांनी नगरपालिकेकडून माहिती घेतली. त्यातून कळाले की, 19 जानेवारी 2009 साली शंभर रुपयांच्या बॉंड पेपर वरती शारदाबाई सोळंके यांची खोटी स्वाक्षरी करून हक्क सोडपत्र तयार केले. तसेच सदर हक्क सोडपत्रात माजी नगराध्यक्ष अशोक होके यांच्या पत्नी उज्वला अशोक होके त्यांना दिला असे नमूद केल्याचे निदर्शनास आले.

फसवणुकीचा गुन्हा दाखलमाजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी नगरपालिकेचे तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक विलास बाबूदेव जोशी, तत्कालीन पीटीआर विभाग प्रमुख आयुब खान इस्माईल खान पठाण व तत्कालीन नामांतर विभाग प्रमुख अशोक भिमराव कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून त्यांची पत्नी उज्वला अशोक होके यांचे नाव बनवत दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वरील पाच जणांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणी हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या