दोन लाखांवरील कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:16+5:302021-06-02T04:25:16+5:30

किराणा दुकाने उघडल्याने गर्दी वाढली कडा : शहरात मंगळवारी किराणा दुकाने उघडल्याने बाजारपेठा गजबजल्या होत्या. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली ...

Forgive the debt above two lakhs | दोन लाखांवरील कर्ज माफ करा

दोन लाखांवरील कर्ज माफ करा

किराणा दुकाने उघडल्याने गर्दी वाढली

कडा : शहरात मंगळवारी किराणा दुकाने उघडल्याने बाजारपेठा गजबजल्या होत्या. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. कोरोना अजून संपलेला नाही, तरी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

...

वैद्यकीय परीक्षेबाबत दिलासा

बीड : राज्यातील वैद्यकीय परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेतल्या जातील, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

...

पेट्रोल महागले ; सर्वसामान्यांत संताप

बीड : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांंना चटका जाणवत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम इतर गोष्टींवर झाला आहे. पर्यायाने महागाई वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोलचे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.

....

बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयाकडे लक्ष

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या; परंतु आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत निर्णय होणार आहे. या निर्णयाकडे पालक, विद्यार्थी यांचे लक्ष लागले आहे. बारावीच्या परीक्षेवर विद्यार्थी वर्गाचे भविष्यातील करिअर अवलंबून असते. यामुळे पालकांचे बारावी परीक्षेकडे लक्ष लागले आहे.

....

Web Title: Forgive the debt above two lakhs