जबरी लूट करणारे त्रिकूट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST2021-09-18T04:36:24+5:302021-09-18T04:36:24+5:30

परळी : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजीनगर भागात एका व्यक्तीला मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ...

Forced looting trio Gajaad | जबरी लूट करणारे त्रिकूट गजाआड

जबरी लूट करणारे त्रिकूट गजाआड

परळी : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजीनगर भागात एका व्यक्तीला मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली होती. जबरी लूट करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना १५ सप्टेेंबर रोजी यश आले. तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

शहरातील अशोकनगरातील रहिवासी नेमीनाथ कांबळे हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात मंदिरात दर्शनास आले होते. यावेळी त्यांना तिघांनी मारहाण करून जखमी केले व नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. संभाजीनगर पोलिसांनी तपास करून तिघांना पकडले. सिद्धार्थ ऊर्फ पिंटू देवडे (वय ३७, रा. अशोकनगर, परळी), रोहित ऊर्फ सोनू घोडके (२०) व अल्ताफ सादेक शेख (१९, दोघे रा. अंबाजोगाई ) यांचा समावेश आहे. उपनिरीक्षक सी. एच. मेंडके, जमादार व्यंकट भताने, विष्णू सानप, मोहन दुर्गे यांनी ही कारवाई केली आहे.

...

सहा दिवसांची पोलीस कोठडी

तिन्ही आरोपींना दि. ६ रोजी न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.

नऊ हजार रुपयांच्या मोबाईलसाठी तिघांना कारागृहाची हवा खावी लागली आहे.

Web Title: Forced looting trio Gajaad