मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:18+5:302021-02-05T08:22:18+5:30
अर्थसंकल्पातून मध्यम वर्गीय कुटुंबीयांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.तेल,गॅस,व विविध वस्तूंचे ...

मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा फोल
अर्थसंकल्पातून मध्यम वर्गीय कुटुंबीयांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.तेल,गॅस,व विविध वस्तूंचे वाढणारे भाव संपूर्ण कुटुंबाचे बजेट कोलमडून टाकते. - प्रभा तट (गृहिणी )
अर्थसंकल्पात बांधकाम व्यावसायिकांसाठी विशेष अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. आर्थिक मंदीतून व्यापारी बाहेर काढण्यासाठी काही विशेष तरतुदी करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही.
-संतोष कुंकुलोळ (बांधकाम व्यावसायिक)
जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल,डिझेल व गॅसच्या दरात झालेली वाढ कायम आहे. डिझेलचे दर वाढल्याने आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. तर गॅस दरवाढीमुळे सामान्य माणसाच्या कुटुंबाला आर्थिक झळ बसली आहे.
-नितीन राऊत(रिक्षा चालक )
प्रत्येक अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा असे दरवेळी सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. शेतकऱ्यांची स्थिती आहे तशीच राहते. साधे पीक कर्ज घेण्यासाठी ही मोठे हेलपाटे घालावे लागतात.
-प्रभाकर कुलकर्णी (शेतकरी)