लोकमत न्यूज नेटवर्कतलवाडा : येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात ३३० ब्रास वाळूसाठा जप्त प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राजापूर येथील वाळू साठ्यांवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काही दिवसांपुर्वी छापा मारून चार हजार ब्रास वाळू जप्त केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर गावात अनेक ठिकाणी असलेली जवळपास चार हजार ब्रास वाळू थेट उचलून नेण्याचा धडक व धाडसी निर्णय घेऊन वाळू चोरांना धडा शिकवला होता.तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर साठे होईपर्यंत महसूल व पोलिस काय करत होते असा सवाल करु न,एवढे मोठे साठे करणाºया वाळू चोरांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुरूवातीला गट.क्र . ७९ व ७१ मध्ये बेकायदेशीर ३३० ब्रास वाळू (किंमत ७ लाख रुपये) साठा केले प्रकरणी करून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सुबोध विजयकुमार जैन यांच्या फिर्यादीवरून आरोपी लखन तुकाराम काळे, बबन आहेर काळे, बंडू रामा काळे, फुलाबाई तुकाराम काळे, भुजंग राहु काळे, भारत गंगाराम पवार, अंबादास राहू चव्हाण, कालिदास सुखदेव काळे, लहू घनशाम चव्हाण या नऊ जणांविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळूचा अवैध वाळू उपसा करुन साठा केल्याबद्दल एक दोन दिवसात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तक्र ार देण्यासाठी महसूलचा कोणताही कर्मचारी व अधिकारी तयार होत नसल्याने गुन्हे दाखल करण्यासाठीची प्रक्रिया होण्यास वेळ लागल्याचे समजते.गुन्हे दाखलचे आदेशजिल्हाधिकाºयांनी छापा मारल्यानंतर गावात अनेक ठिकाणी चार हजार ब्रास वाळू थेट उचलून नेण्याचा धडक व धाडसी निर्णय घेऊन वाळू चोरांना धडा शिकवला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर साठे होईपर्यंत महसूल व पोलीस काय करत होते? असा सवाल करुन वाळू चोरांचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३३० ब्रास वाळू किंमत ७ लाख साठा प्रकरणी गुन्हे दाखल झाले.
बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:47 IST
येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात ३३० ब्रास वाळूसाठा जप्त प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर गेवराई तालुक्यात वाळूचोरांवर गुन्हे दाखल
ठळक मुद्देराजापूर शिवार। ३३० ब्रास वाळूसाठा जप्त प्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल