स्त्री जातीचे नवजात अर्भक बेवारस सोडून मातेचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:02+5:302021-07-09T04:22:02+5:30
कडा (जि. बीड) - कडा-धामणगाव रोडवर असलेल्या देवीनिमगाव येथील देवीच्या मंदिराजवळ स्त्री जातीच्या नवजात अर्भकास रात्री १ वाजता ...

स्त्री जातीचे नवजात अर्भक बेवारस सोडून मातेचे पलायन
कडा (जि. बीड) - कडा-धामणगाव रोडवर असलेल्या देवीनिमगाव येथील देवीच्या मंदिराजवळ स्त्री जातीच्या नवजात अर्भकास रात्री १ वाजता बेवारस सोडून मातेने पलायन केले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री दीडच्या सुमारास मंदिरातील हारू आक्का यांच्या निदर्शनास आला.
देवीनिमगाव येथील जगदंबा देवीच्या मंदिर परिसरात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा रडण्याचा आवाज येथील हारू आक्का यांच्या कानांवर पडला. त्या नवजात बालकाजवळ कोणी नसून ते टाहो फोडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गावातील सरपंच बिटू पोपळे यांना बोलावून घेत प्रकार सांगितला. मग, लगेच सरपंचांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फोन करून घटना सांगताच सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस कर्मचारी थोरवे, काळकुटे यांनी ते
अर्भक व गावातील सरपंच बिटू पोपळे, अशोक चव्हाण, मालुजी फिस्के, काका ढवळे अन्य कार्यकर्ते यांना घेऊन ते अर्भक आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालकल्याण समितीपुढे हजर करून न्यायालयाच्या आदेशानुसार संगोपनासाठी बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सांगितले.
080721\nitin kmble_img-20210708-wa0006_14.jpg