पळून आलेले युगल केजमध्ये पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:28+5:302021-02-05T08:23:28+5:30
या गुन्ह्यात तपासादरम्यान ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांनी दोघांचे सर्व कॉल डिटेल्स आणि लोकेशनची माहिती घेतली. त्यानुसार ठाणे ...

पळून आलेले युगल केजमध्ये पकडले
या गुन्ह्यात तपासादरम्यान ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांनी दोघांचे सर्व कॉल डिटेल्स आणि लोकेशनची माहिती घेतली. त्यानुसार ठाणे येथील सपोनि प्रवीण लोटणकर, चंद्रकांत सकपाळ, आप्पासाहेब भावाने व महिला कर्मचारी रूपाली पाटील यांचे पथक केज येथे आले. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना सर्व माहिती दिली. त्रिभुवन यांनी उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, बाळासाहेब अहंकारे व दिलीप गित्ते यांच्या पथकावर तपासाची कामगिरी सोपविली. संयुक्त पथकाने त्या तरुणाचे वडील व मित्राला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच २५ जानेवारी रोजी अल्पवयीन मुलगी व तिला पळवून आणणाऱ्या तरुणास केज येथील शुक्रवार पेठ, समर्थ मठाजवळील एका घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ठाणे येथे नेले. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणाविरुद्ध भादंवि ३६३, ३७६ आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.