जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिट इंडिया उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST2020-12-28T04:17:54+5:302020-12-28T04:17:54+5:30

व्यायामाची प्रात्यक्षिके : चर्चासत्र, निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद शिरूर कासार : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत राष्ट्रीय ग्राहक ...

Fit India activities in Zilla Parishad Secondary School | जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिट इंडिया उपक्रम

जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत फिट इंडिया उपक्रम

व्यायामाची प्रात्यक्षिके : चर्चासत्र, निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

शिरूर कासार : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून फिट इंडिया हिट इंडिया उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त चर्चासत्र, निबंध स्पर्धा व चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. युवा स्वास्थ व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित फिट इंडिया हिट इंडिया या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी क्रीडा शिक्षक पुरी यांनी शारीरिक हालचाली, चालणे, धावणे, योगासने व ॲरोबिक व्यायामाची प्रात्यक्षिके करून घेतली. विविध स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अंकुष शिंदे सह गट शिक्षणाधिकारी जमीर शेख, युवराज सोनवणे तावरे यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदा धाबे, संध्या नागरे, वंदना गाडेकर, दीपा खेडकर, द्वारका पालकर, आण्णा गवळी, प्रल्हाद गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पवार तर आभार पुरी यांनी मानले.

स्पर्धांचा निकाल

वकृत्व स्पर्धेत ऋतुजा खेडकर प्रथम, मारिया पठाण द्वितीय व पूजा काटे तृतीय आली. चित्रकलेत सायली गाडेकर प्रथम, रुमिसा द्वितीय, सुमित शिंदे हा तिसरा आला. पोस्टर स्पर्धेत अक्षय नरोटे प्रथम, ऋतुजा झिंजुर्डे द्वितीय तर तृतीय क्रमांक गणेश मासाळकर याने पटकावला. निबंध स्पर्धेत साक्षी भिसे प्रथम, निकिता चांदणे द्वितीय तर ऋतुजा खेडकर तृतीय बक्षीसपात्र ठरली.

Web Title: Fit India activities in Zilla Parishad Secondary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.