विद्यापीठात सर्वप्रथम; ऐश्वर्या टाक हिचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:45+5:302021-02-05T08:27:45+5:30

अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत ऐश्वर्या राजेंद्रकुमार टाक हिने विद्यापीठात प्रथम ...

First in university; Aishwarya Tak felicitated | विद्यापीठात सर्वप्रथम; ऐश्वर्या टाक हिचा सत्कार

विद्यापीठात सर्वप्रथम; ऐश्वर्या टाक हिचा सत्कार

अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत ऐश्वर्या राजेंद्रकुमार टाक हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकाविला. बी.जे. परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस देण्यात येणारे ‘लोकमत सुवर्णपदक’ तिला प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष बबन लोमटे, सामाजिक कार्यकर्त्या सुनंद टाक आदींची उपस्थिती होती.

बी.जे. अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस माजी मंत्री तथा लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या वतीने सुवर्णपदक प्रदान करण्यात येते. ऐश्वर्या राजेंद्र टाक ही सिद्धार्थ ग्रंथालयशास्त्र व पत्रकारिता महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने बी.जे. परीक्षेत ७१.८ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

‘आयआयएमसी’ देशात तिसरी

ऐश्वर्या टाक ही अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची माजी विद्यार्थिनी आहे. देशातील नामवंत संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (नवी दिल्ली) या संस्थेच्या प्रवेशपूर्व परीक्षेत तिने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जाहिरात व जनसंपर्क या अभ्यासक्रमात तिने शंभरपैकी ९६ गुण पटकाविले आहेत. तसेच विद्यापीठातील वाणिज्य शास्त्र विभागातील प्रवेशपूर्व परीक्षेतही ती पहिली आहे. देवीकृपा सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सुनंदताई टाक यांची ती कन्या आहे.

Web Title: First in university; Aishwarya Tak felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.