७६ वर्षात पहिल्यांदाच हरिकीर्तनाविना महाशिवरात्री महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:22+5:302021-03-13T04:59:22+5:30
वडवणी : यावर्षी पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाशिवरात्री निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवालय बंद ठेवण्याचा निर्णय ...

७६ वर्षात पहिल्यांदाच हरिकीर्तनाविना महाशिवरात्री महोत्सव
वडवणी
: यावर्षी पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाशिवरात्री निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील सर्व शिवालय बंद राहिल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
भारतातील एकमेव राजा हरिश्चंद्राचे मंदिर असणारे पिंप्री येथील यावर्षीचा महाशिवरात्र महोत्सव ७६ वर्षांनंतर प्रथमच हरिकीर्तनाविना साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच भाविकभक्ताविना महाशिवरात्री महोत्सव साजरा झाल्याची माहिती मठाधिपती भगवान महाराज राजपूत यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावत असतात. आठ दिवसीय महाशिवरात्र महोत्सवात मोठ्या प्रमाणात अन्नदान होऊन नामांकित कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळत; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७६ वर्षांनंतर फक्त जागर, वीणा वादन, हरिपाठ, काकडा, भजन आठ दिवस करून हरिकीर्तन सेवा बंद ठेवण्यात आली होती. यावर्षीचा सोहळा रद्द झाल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.
===Photopath===
110321\rameswar lange_img-20210311-wa0006_14.jpg
===Caption===
हरिश्चंद्र पिंप्री येथे भगवान गडाचे मठाधिपती नामदेव महाराज शास्त्रींनी दर्शन घेतले.