दीड वर्षानंतर जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:30+5:302021-06-17T04:23:30+5:30

बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सुरू केल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा रुग्णालयात ...

The first surgery at the district hospital after a year and a half | दीड वर्षानंतर जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया

दीड वर्षानंतर जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया

बीड : कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सुरू केल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया बुधवारी पार पडली. बीड शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीच्या पाठीतील संत्र्याएवढी गाठ सहज काढत ही शस्त्रक्रिया वैद्यकीय तज्ज्ञांनी यशस्वी केली. यापुढे नियमित शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

बीड शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीला पाठीत गाठ होती. ती त्रासदायक ठरत असल्याने ते वारंवार जिल्हा रुग्णालयात आले; परंतु कोरोनामुळे शस्त्रक्रिया बंद असल्याने ती काढता आली नाही. याचा त्रास त्यांना खूप झाला. तब्बल दीड वर्षापासून अत्यावश्यक वगळता एकही शस्त्रक्रिया झाली नव्हती. ही बाब नव्याने पदभार घेतलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना समजली. त्यांनी तत्काळ शल्यचिकित्सकांना सूचना करीत शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे बुधवारी पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. माजेद शेख, डॉ. पाटील व त्यांच्या टीमने यासाठी परिश्रम घेतले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. आय.व्ही. शिंदे, डॉ. राम देशपांडे, डॉ. किरण शिंदे, डॉ. मस्तूद, डॉ. परमेश्वर डोंगरे, यमुना गायकवाड, सपकाळ आदींची उपस्थिती होती.

--

नागरिकांनो, जिल्हा रुग्णालयातच घ्या उपचार

मागील काही महिन्यांपासून नॉन कोविडचा ढेपाळलेला कारभार सध्या सुधारल्याचे काही प्रमाणात दिसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कारवाईची तंबी दिल्याने नियमित राउंड घेण्यासह ओपीडीत बसत असल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांनी आता जिल्हा रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत. सुविधा आणि सेवेबद्दल अडचण वाटल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

--

कोरोनामुळे थांबलेल्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सुरू झाल्या आहेत. इतर आराेग्य संस्थांमध्येही याबाबत सूचना केल्या जातील. रुग्णांनी सरकारी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत. अडचण वाटल्यास माझ्याकडे तक्रार करावी, तसेच प्रत्येक ठिकाणी लावलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सॲप करावे.

डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

===Photopath===

160621\16_2_bed_9_16062021_14.jpeg

===Caption===

दीड वर्षानंतर जिल्हा रूग्णालयात पहिली शस्त्रक्रिया झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.राम देशपांडे, डॉ.माजेद शेख, डॉ.पाटील, डॉ.किरण शिंदे, डॉ.मस्तूद, डॉ.परमेश्वर डोंगरे, यमुना गायकवाड, सपकाळ आदी दिसत आहेत.

Web Title: The first surgery at the district hospital after a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.