ज्ञानेश्वर गाढेच्या शिल्पकलेस राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:02 IST2020-01-29T00:00:12+5:302020-01-29T00:02:09+5:30
माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक ...

ज्ञानेश्वर गाढेच्या शिल्पकलेस राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार
माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
ज्ञानेश्वर गाढे याने जे.जे. कला महाविद्यालय, मुंबई येथे शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे. कला संचालनालयाच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्याने आपली शिल्पकला सादर केली होती. या कलाकृतीस शिल्पकला या विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले. हे कला प्रदर्शन यशवंत कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे २९ जानेवारीपर्यंत आहे.
या पूर्वी ही चित्रकला आणि शिल्पकला प्रकारामध्ये त्याने अनेक बक्षीसे पटकावली आहेत.त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला प्रोत्साहनाची तसेच आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत असून सरपंच शाहेद पटेल, महारु द्र सटाले,आसाराम गाढे, अशोक गोरे शेख जफर, शेख अबूझर व इतर गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.