आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दि. १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस सरकारी दवाखान्यात मोफत देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणीमुळे लसीकरण होऊ शकले नाही. परंतु, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. वाल्मीक निकाळजे यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक बलभीमराव सुंबरे यांनी लस घेतली, तर ३ मार्च रोजी माजी आ. भीमराव धोंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. दोन दिवसांत ग्रामीण रुग्णालयात २७५ जणांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. ही लस देण्यासाठी डॉ. सुषमा सुंबे, परिचारिका ए. बी. शेख, शोभा आष्टेकर, अस्पिया शेख, राखी नाईकनवरे, मीरा पोटे या परिश्रम घेत आहेत. मीही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असून, तुम्हीही घ्या, लसीकरण करा, कोरोनाला हरवा.
लस घेण्यासाठी पात्र असणाऱ्या सर्वांनी लस घ्यावी. शरीरात ॲन्टिबॉडीज तयार करण्यासाठी लस महत्त्वाची असून, रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळणार आहे. क्षणभराचा त्रास सोडा. रोगप्रतिकारक शक्तीकडे लक्ष द्या. मी लस घेतली आहे, तुम्हीही लस घ्यावी.
- भीमराव धोंडे, माजी आमदार
===Photopath===
030321\img-20210303-wa0267_14.jpg