बीडच्या सहयोग नगरात पहिला कंटेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:32 IST2021-03-06T04:32:07+5:302021-03-06T04:32:07+5:30
बीड : एखाद्या ठिकाणी १०० मीटरच्या अंतरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून घोषित ...

बीडच्या सहयोग नगरात पहिला कंटेनमेंट झोन
बीड : एखाद्या ठिकाणी १०० मीटरच्या अंतरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जात आहे. शुक्रवारी बीड शहरातील सहयोग नगर भागातील एक इमारत बंद करण्यात आली. बीड नगरपालिकेने सकाळीच या इमारतीला फलक लावून काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासन आता कठोर उपाययोजना करत आहे. यापूर्वी एखादा रुग्ण आढळला तरी संबंधित गल्ली अथवा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जात होता; परंतु, नंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने हे बंद झाले होते; परंतु आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा कंटेनमेंट झोन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने बीड शहरातील सहयोगनगर भागात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. बीड नगर पालिकेने या ठिकाणी फलक लावला आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे.
===Photopath===
050321\052_bed_24_05032021_14.jpeg
===Caption===
सहयोग नग्र भागात अशाप्रकारे फलक लावून हा परिसर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.