शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

परळीत गोळीबार; भेट देऊन परतताना एसपी नवनीत काँवत यांच्या गाडीचा केजजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:25 IST

डिव्हायडरवर चढल्याने गाडीचे नुकसान; पण जीवितहानी टळली

केज : बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज येथे अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री परळी येथील विद्यानगर भागात गोळीबाराची घटना घडल्यामुळे पोलिस अधीक्षक काँवत हे तातडीने परळी येथे गेले होते. परळीहून केज मार्गे बीडकडे परतत असताना केज येथील केजडी नदी ओलांडल्यानंतर हा अपघात झाला.

केजडी नदी ओलांडल्यानंतर लगेच रस्त्यावर डिव्हायडर सुरू झाला होता. चालकाच्या वेळेत लक्षात न आल्यामुळे त्यांची गाडी उजव्या बाजूने डिव्हायडरवर चढली आणि अपघात झाला. त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे बॉडीगार्डची गाडी होती, त्यामुळे डिव्हायडरवर चढलेली गाडी तत्काळ खाली घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर केज पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आणि पोलिस अधीक्षक बीडकडे रवाना झाले.

मी सुखरूप - एसपीअपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘काळजी करण्याचे कारण नाही, मी सुखरूप आहे.’ तसेच, त्यांच्यासोबत असलेली त्यांची टीमही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताची तीव्रता जास्त असूनही जीवितहानी न होण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘गाडीत बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावले होते. त्यामुळे गाडी डिव्हायडरवर आदळूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.’

English
हिंदी सारांश
Web Title : Beed SP's car accident near Kej after Parli shooting visit.

Web Summary : SP Navneet Kanwat's car met with an accident near Kej after visiting Parli due to a shooting incident. Fortunately, no one was injured. The accident occurred when the car hit a divider. SP Kanwat confirmed everyone was safe due to wearing seatbelts.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस