सोयाबीनच्या ढिगाऱ्याला लावली आग; ८५ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:30+5:302021-03-17T04:34:30+5:30

या आगीत शेतकऱ्याच्या सोयाबीनचे अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

A fire set on a heap of soybeans; Loss of Rs 85,000 | सोयाबीनच्या ढिगाऱ्याला लावली आग; ८५ हजारांचे नुकसान

सोयाबीनच्या ढिगाऱ्याला लावली आग; ८५ हजारांचे नुकसान

या आगीत शेतकऱ्याच्या सोयाबीनचे अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एका जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील आनेगाव येथील प्रचंड सोपान हंडीबाग या शेतकऱ्याने

त्यांच्या शेतात सोयाबीन काढून त्याचा ढिगारा करून ठेवला होता. त्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास रविवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान शेजारच्या बाळसाहेब छब्बू हंडीबाग याने आग लावून दिली. मी तुझी सोयाबीन जाळली आहे, तुला काय करायचे तर कर! अशी धमकी देऊन निघून गेल्याचे प्रचंड हंडीबाग या शेतकऱ्याने सोमवारी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी बाळासाहेब हंडीबाग यांच्या विरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक पिंपळे हे करत आहेत.

Web Title: A fire set on a heap of soybeans; Loss of Rs 85,000