सिंगणवाडीत डोंगर परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:30+5:302021-03-24T04:31:30+5:30

धारूर : तालुक्यातील सिंगणवाडीजवळ मोहखेड ते आडस रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने डोंगर परिसरातील झाडे व गवत जळून ...

Fire in the mountain area of Singanwadi | सिंगणवाडीत डोंगर परिसरात आग

सिंगणवाडीत डोंगर परिसरात आग

धारूर : तालुक्यातील सिंगणवाडीजवळ मोहखेड ते आडस रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने डोंगर परिसरातील झाडे व गवत जळून राख झाले. दरम्यान पसरणारी आग येथील तरूणांनी तात्काळ अटोक्यात आणल्याने वनविभागाच्या जमिनीतील झाडे वाचली. मोहखेड ते आडस रोड सिंगणवाडी पाटीजवळ उखळदऱ्याच्या माथ्यावर अज्ञात इसम आग लावून पसार झाला. आगीचे लोळ दिसताच नानासाहेब भोसले ,बालासाहेब भोसले, सचिन इंगोले, श्रीनिवास माचवे , अजय वाशिबे व परिसरातील शेतकरी व तरुण धावत गेले व त्यांनी आग अटोक्यात आणली. या आगीत डोंगरावरील झाडे ,झुडपे जळून खाक झाली. शेतकरी व तरूणांनी आग विझवली आग विझली नसती तर वनविभागाचे दोनशे एकर वन जळाले असते, असे बोलले जात होते.

===Photopath===

230321\img-20210323-wa0131_14.jpg~230321\img-20210323-wa0129_14.jpg

Web Title: Fire in the mountain area of Singanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.