शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

तीन ठिकाणी आगीच्या घटना

By admin | Updated: April 29, 2015 15:50 IST

बीड : जिल्ह्यात मंगळवारी तीन ठिकाणी अग्नीतांडव निर्माण झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. बीड तालुक्यातील नागापूर येथे घर, सोनगाव येथे गंज तर पाटोदा येथे स्टेट बँक शाखेत आग लागली.

बीड : जिल्ह्यात मंगळवारी तीन ठिकाणी अग्नीतांडव निर्माण झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. बीड तालुक्यातील नागापूर येथे घर, सोनगाव येथे गंज तर पाटोदा येथे स्टेट बँक शाखेत आग लागली. नागापूर (बु.) येथील ऊसतोड मजूर नंदू नाना ढोकणे यांच्या घराने दुपारी पेट घेतला. ढोकणे हे दोन दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरी करून गावी परतले होते. संसारोपयोगी साहित्य, धान्य आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी तातडीने आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अडीच हजार कडबा खाकबीड तालुक्यातील सोनगाव येथे दुपारी २ वाजता राजाभाऊ रामभाऊ घिगे यांच्या गंजीला आग लागली. त्यामध्ये अडीच हजार कडबा जळून भस्मसात झाला. आधीच चाऱ्याची टंचाई आहे. त्यात आहे तो कडबाही गेल्यामुळे घिगे यांच्यावर संकट कोसळले आहे. पाटोद्यात बँकेला आगपाटोदा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेच्या सर्व्हर कक्षाला आग लागली. व्यवस्थापक सचिन त्रिपाठी यांनी तातडीने अग्नीशमन यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीने बँकेत मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. आग वेळीच विझविल्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. (प्रतिनिधींकडून)