तीन ठिकाणी आगीच्या घटना
By Admin | Updated: April 29, 2015 15:50 IST2015-04-29T00:31:29+5:302015-04-29T15:50:03+5:30
बीड : जिल्ह्यात मंगळवारी तीन ठिकाणी अग्नीतांडव निर्माण झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. बीड तालुक्यातील नागापूर येथे घर, सोनगाव येथे गंज तर पाटोदा येथे स्टेट बँक शाखेत आग लागली.

तीन ठिकाणी आगीच्या घटना
बीड : जिल्ह्यात मंगळवारी तीन ठिकाणी अग्नीतांडव निर्माण झाले. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. बीड तालुक्यातील नागापूर येथे घर, सोनगाव येथे गंज तर पाटोदा येथे स्टेट बँक शाखेत आग लागली.
नागापूर (बु.) येथील ऊसतोड मजूर नंदू नाना ढोकणे यांच्या घराने दुपारी पेट घेतला. ढोकणे हे दोन दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुरी करून गावी परतले होते. संसारोपयोगी साहित्य, धान्य आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी तातडीने आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अडीच हजार कडबा खाक
बीड तालुक्यातील सोनगाव येथे दुपारी २ वाजता राजाभाऊ रामभाऊ घिगे यांच्या गंजीला आग लागली. त्यामध्ये अडीच हजार कडबा जळून भस्मसात झाला. आधीच चाऱ्याची टंचाई आहे. त्यात आहे तो कडबाही गेल्यामुळे घिगे यांच्यावर संकट कोसळले आहे.
पाटोद्यात बँकेला आग
पाटोदा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेच्या सर्व्हर कक्षाला आग लागली. व्यवस्थापक सचिन त्रिपाठी यांनी तातडीने अग्नीशमन यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीने बँकेत मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्यामुळे कामकाज विस्कळीत झाले. आग वेळीच विझविल्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. (प्रतिनिधींकडून)