गेवराई : तालुक्यातील पांचाळेश्वर येथील एका घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख १ लाख ४० हजार रूपये जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील पांचाळेश्वर येथे देविदास भीमराव शिंदे यांचे गावातच घर असून त्यांच्या राहत्या घराला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत शिंदे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शिंदे यांनी ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी घरात आणून ठेवलेले नगदी १ लाख ४० हजार रु पयेदेखील जाळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने जास्तच पेट घेतल्याने आटोक्यात आली नाही. बघता बघता घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग कशामुळे लागली, हे मात्र समजु शकले नाही.या प्रकरणी उशिरापर्यंत चकलांबा ठाण्यात नोंद झाली नव्हती. मात्र आगीत शिंदे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पांचाळेश्वरमध्ये घराला आग; दीड लाख रुपयांची राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:09 IST
तालुक्यातील पांचाळेश्वर येथील एका घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख १ लाख ४० हजार रूपये जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
पांचाळेश्वरमध्ये घराला आग; दीड लाख रुपयांची राख
ठळक मुद्देट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी ठेवली होती रक्कम