आपदग्रस्त कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST2021-04-26T04:30:19+5:302021-04-26T04:30:19+5:30
: तालुक्यातील भोपा येथे गॕॅसगळतीमुळे आग लागून शेख अन्वर शेख बशीर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. या कुंटूंबाला ...

आपदग्रस्त कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
: तालुक्यातील भोपा येथे गॕॅसगळतीमुळे आग लागून शेख अन्वर शेख बशीर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. या कुंटूंबाला सामाजीक कार्यकर्ते महादेव वाघचौरे यांनी पुढाकार घेऊन अकरा हजार रुपयांची मदत केली. तसेच भोपा येथील शिवजन्मोत्सव मित्र मंडळाने किराणा सामान व अन्नधान्याची मदत केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक विष्णू पोपळे, सुभाष वांढरे, सुधाकर वाघचौरे, संदिपान वाघचौरे, पांडुरंग उबाळे, संतोष वाघचौरे, विजय वाघचौरे, वसंत गायकवाड, अविनाश खोत, विशाल मुळे, अमोल वाघचौरे, नूर पठाण, निलेश वाघचौरे आदी उपस्थित होते. २१ एप्रिल रोजी सायंकाळी शेख अन्वर शेख बशीर यांच्या पत्नी उपवास सोडून स्वयंपाक करताना गॅस गळतीमुळे आग लागून सर्व घरातील संसारोपयोगी वस्तू व तसेच घरातील रोख रक्कम, अन्नधान्य जळून खाक झाले होते. त्यामुळे या कुटुंबाला मदत करण्यात आली.
भोपा येथील आपदग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
===Photopath===
250421\anil mhajan_img-20210425-wa0050_14.jpg