गजानन खंडागळे यास आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST2021-09-18T04:36:59+5:302021-09-18T04:36:59+5:30
गजानन खंडागळे याने एअर रायफल स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे गेवराई तालुक्याची मान उंचावली आहे. शारदा प्रतिष्ठान ...

गजानन खंडागळे यास आर्थिक मदत
गजानन खंडागळे याने एअर रायफल स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे गेवराई तालुक्याची मान उंचावली आहे. शारदा प्रतिष्ठान त्यांच्या पाठिशी खंबीर उभे आहे, असे विजयसिंह पंडित यांनी सांगितले.
तलवाडा येथील गजानन खंडागळे हा खेळाडू महाराष्ट्र राज्य एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता ठरला आहे. खंडागळे याची घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. यामुळे त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. पंडित यांच्याहस्ते आर्थिक मदतीचा धनादेश गजाननचे वडील शहादेव काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी दैठणचे सरपंच प्रताप पंडित यांच्यासह नितीन पंडित, विलास देवकते, नामदेव घोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत