मयत ग्रामसेवकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:18+5:302021-06-22T04:23:18+5:30
तालुक्यातील आडस येथील संतोष आकुसकर यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक पदावर १४ वर्षे सेवा केली. केकाणवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सेवेत ...

मयत ग्रामसेवकाच्या कुटुंबीयास आर्थिक मदत.
तालुक्यातील आडस येथील संतोष आकुसकर यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक पदावर १४ वर्षे सेवा केली. केकाणवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सेवेत असताना मागील ऑक्टोबर महिन्यात त्याचे अकस्मात निधन झाले. कंत्राटी पदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच अकाली निधन झाल्याने त्यांचे कुटुंब पेन्शनसाठी पात्र ठरले नाही. त्यातच कुटुंबाचा आधार गेल्याने पत्नी व लहान दोन मुलांवर आर्थिक संकट कोसळले.
सहकाऱ्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करत पत्नी अंजली आकुसकर व दोन लहान मुलांना ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तीन लाख एकवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. पंचायत समिती अंतर्गत सेवा करणाऱ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी केज पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी पंचवीस हजार रुपये मदतीचा धनादेश त्यांच्या पत्नीकडे देण्यात आला आहे. यावेळी सहायक प्रशासन अधिकारी सविता शेप, बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे, प्रशासन अधिकारी अजय ढोकर, कनिष्ठ सहायक शाम राऊत व ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष धनराज सोनवणे उपस्थित होते.
===Photopath===
210621\1938-img-20210621-wa0010.jpg
===Caption===
मयत ग्रामसेवकांच्या पत्नीकडे पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचेवीस हजार रूपये मदतीचा धनादेश देताना सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती सविता शेप, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा लटपटे, आदी