अखेर संभाजीनगरमध्ये पूल, नाल्यांचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:27+5:302021-02-08T04:29:27+5:30
माजलगाव : शहरातील संभाजीनगर येथील पूल फुटल्याने नागरिकांना मागील एक वर्षापासून या ठिकाणावरून चालणे अवघड झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने ...

अखेर संभाजीनगरमध्ये पूल, नाल्यांचे काम सुरू
माजलगाव : शहरातील संभाजीनगर येथील पूल फुटल्याने नागरिकांना मागील एक वर्षापासून या ठिकाणावरून चालणे अवघड झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच नगरपालिकेने तत्काळ पुलाचे व नाल्यांचे काम सुरू केले.
संभाजीनगर भागात असलेल्या रस्त्यावरील पूल मागील एक वर्षांपासून तुटला होता. यामुळे या भागातील नागरिकांना चालणे अवघड झाले होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगरपालिकेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून व तोंडी सांगूनही याकडे दोन्ही नगरसेवक व नगराध्यक्षांचे लक्ष नव्हते. याबाबत २ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने ‘नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या वादात पुलाचे काम रखडले,’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच नगराध्यक्ष शेख मंजुर यांनी दखल घेत तत्काळ येथील नाल्यांचेदेखील काम सुरू केले. यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.