अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 16:37 IST2021-11-29T16:37:03+5:302021-11-29T16:37:46+5:30

टाकळसिंग सज्जाच्या कार्यालयात महापुरुषांच्या फोटोंचा विसर

Finally Talathi took off a photo of himself from the office; But forget the photos of great men | अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर

अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर

- नितीन कांबळे 
कडा (बीड ) : महापुरुषांच्या फोटो ऐवजी स्वतःचा फोटो कार्यालयात लावलेल्या तलाठ्याने अखेर कार्यालयातून फोटो काढला आहे. मात्र, शासकीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर संबंधित तलाठ्यांना पडल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील टाकळसिंग सज्जाचे कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आहे. येथे अरुण मोरे हे तलाठी कार्यरत आहेत. या सज्जा अंतर्गत हिंगणी, पिंपळ सुट्टी, वाकी, टाकळसिंग अश्या गावाचा समावेश आहे. शासकीय असो कि निम शासकीय कार्यालय असो प्रत्येक ठिकाणी महापुरुषांचे फोटो कार्यालयात असणे बंधनकारक आहे, असे असताना तलाठी अरुण मोरे यांनी एकाही महापुरुषाचा फोटो कार्यालयात लावला नाही. उलट महापुरुषांऐवजी मोरे यांनी चक्क स्वतःचाच सैनिकी गणवेशातीला फोटो कार्यालयात लावल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने चार दिवसांपूर्वी समोर आणला होता. 

हा प्रकार समोर आल्यानंतर तलाठी मोरे यांनी आज स्वतःचा फोटो काढून टाकला आहे. परंतु, त्यांना कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावण्याचा विसर पडल्याचे दिसत आहे. या मुजोर तलाठ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Finally Talathi took off a photo of himself from the office; But forget the photos of great men