...अखेर इमामपूर रस्ता खुला, अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:20+5:302021-02-05T08:27:20+5:30
- फोटो बीड : शहरातील बार्शी नाका येथून इमामपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी पालिकेने हातोडा चालविला. आता ...

...अखेर इमामपूर रस्ता खुला, अतिक्रमणांवर हातोडा
- फोटो
बीड : शहरातील बार्शी नाका येथून इमामपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेेल्या अतिक्रमणांवर गुरुवारी पालिकेने हातोडा चालविला. आता हा रस्ता खुला झाला असून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला. यावेळी पोलीस बंदोबस्तासह पालिकेची तगडी यंत्रणा कार्यान्वित होती.
शहरात सध्या विविध विकासकामे केली जात आहेत. यात रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ता कामांचाही समावेश आहे. इमामूपर रोडही डीपी रोड म्हणून निश्चित झाल्यानंतर केवळ चार दोन अतिक्रमणांमुळे तो रखडला होता. याबाबत उपोषणही करण्यात आले होते. याची दखल घेत पालिकेने गुरुवारी सकाळीच पोलीस बंदोबस्तात कारवाईची मोहीम हाती घेतली. ६० फुटांच्या रस्त्यात जी घरे, पत्र्याचे शेड, टपऱ्या आल्या, त्यावर हातोडा फिरवण्यात आला. आता या रस्ता कामास तात्काळ सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, सहायक नगररचनाकार लिमगे, कावलकर, अभियंता नितीन रेवणवार, अखील फारोखी, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, राजु वंजारे, मुन्ना गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
अशी होती यंत्रणा
या मोहिमेसाठी तगड्या पोलीस बंदोबस्तासह पालिकेचे २ स्वच्छता निरीक्षक, अभियंता, नगररचना विभाग, ३ जेसीबी, ट्रॅक्टर, कामगार अशी यंत्रणा या कारवाईत होती.