शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अंतिम निकालास लागणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:42 PM

उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देबीड लोकसभा मतदारसंघ : तयारी पूर्ण; विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी - जिल्हाधिकारी पाण्डेय

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदार संघांची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून विधानसभानिहाय प्रत्येकी १४ म्हणजे ८४ टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांची संख्या जास्त आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी करावी लागणार असल्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीरच होणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार हे रिंगणात उतरले होते.शहरातील कुर्ला रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतदान मोजले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान मोजणीस सुरुवात होईल. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवर म्हणजे एकूण ८४ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. बीड, माजलगाव, गेवराई, आष्टी, केज आणि परळी अशा सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण ८४ मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन मोजणीस घेण्यात येणार असून, या ८४ ईव्हीएमच्या मतमोजणीची एक फेरी असेल. गेवराईमध्ये ३९६ मतदान केंद्रे (२९ फेऱ्या), माजलगाव - ३७४ (२७ फेºया), बीड - ३७१ (२७ फेºया), आष्टी - ४३८ (३२ फेºया), केज - ४०७ (२९ फेºया) आणि परळी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३३९ असून, २५ फेºया होतील.मतदारसंघामध्ये एकूण २३२५ मतदान केंद्रे असून, मतमोजणी फेऱ्यांची संख्या १६९ असेल. बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या ३६ आणि नोटा १ असे ३७ जणांना पडलेल्या मतदानकेंद्रनिहाय मतदानाचे आकडे भरावे लागत असल्यामुळे त्यास वेळ लागणार आहे. आष्टीमध्ये सर्वाधिक ३२ फेºया, तर परळीमध्ये सर्वात कमी म्हणजे २५ फेºया होतील.मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक यांची सरमिसळ नियोजन १६ मे रोजी झाले होते. त्यानंतर दुसरे सरमिसळ नियोजन २२ मे रोजी होणार असून, तिसरे सरमिसळ नियोजन मतदानाच्या दिवशी होईल. त्यामुळे कुठला कर्मचारी, कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये, कुठल्या टेबलवर असेल हे त्या कर्मचाºयास मतमोजणीच्या दिवशी कळेल.मतमोजणीचे प्रशिक्षण १७ मे रोजी झाले. दुसरे प्रशिक्षण (रंगीत तालीम) २२ मे रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत जवळपास दोन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघनिहाय ठेवण्यात आल्या आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी बाजारसमितीमधील हॉल क्र. १ मध्ये होईल. प्रत्येक विधानसभानिहाय ईव्हीएम मशीनसाठी स्वतंत्र स्ट्राँग रुम आहे. त्या त्या विधानसभेच्या स्ट्राँगरुममधून पहिल्या फेरीसाठी प्रत्येकी १४ ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी एकूण ८४ टेबलवर घेतल्या जातील.त्या त्या विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकाºयाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी ही उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर होईल. यावेळी सूक्ष्म निरीक्षक देखील या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील.सुरक्षा तपासणीनंतर मतमोजणी कक्षात प्रवेश : ५ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मतमोजणीलॉटरी पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्राची निवड व्हीव्हीपॅटसाठी केली जाणार आहे.या पाच व्हीव्हीपॅटच्या मतदानाची मोजणी करण्यासाठी एका स्वतंत्र टेबलाची व्यवस्था करण्यात येणार आहे.ज्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीसाठी निवड झाली त्यातील मते त्या मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या मतदानाशी जुळविण्यात येतील.मतमोजणी परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोबाईल, कॅमेरा यासारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वस्तू मतदानमोजणी कक्षामध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.सुरक्षेच्या तीन स्तरातून मतमोजणी कक्षात संबंधितांना कडक तपासणीनंतर जाता येईल. मतमोजणी परिसर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पॅरामिलिट्री तैनात करण्यात आलेली आहे.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९collectorजिल्हाधिकारी