तलाठ्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:12+5:302021-07-08T04:23:12+5:30
बीड : शेती व जागेच्या सातबारावर मल्टिस्टेटचा बोजा असतानादेखील तो न दाखवता बनावट दस्तऐवज तयार केले. यानंतर त्याचे खरेदी ...

तलाठ्यासह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
बीड : शेती व जागेच्या सातबारावर मल्टिस्टेटचा बोजा असतानादेखील तो न दाखवता बनावट दस्तऐवज तयार केले. यानंतर त्याचे खरेदी खत करून दिल्याप्रकरणी वडवणी तालुक्यातील साळींबा सज्जाचे तत्कालीन तलाठी व अन्य दोघांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीचे वडवणीचे शाखा व्यवस्थापक राजा विष्णू पोकळे यांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आत्माराम बळीराम जाधव यांच्या जमिनीवर ज्ञानराधा बँकेच्या नावे गहाण खत करून दिले असताना त्यांनी जगन्नाथ दादाराव तोगे यांना शेतजमीन विकली. त्याकाळचे तत्कालीन तलाठी एस.एस. राठोड यांनी साताबारा बँकेचा बोजा असतानादेखील तो न दाखवता बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी खत करून दिले आहे. हा सर्व प्रकार ५ मे २०१४ ते २५ जून २०२१ या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक राजा विष्णू पोकळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आत्माराम बळीराम जाधव व जगन्नाथ दादाराव तोगे (रा.साळींबा, ता.वडवणी) यांच्यासह तत्कालीन तलाठी एस.एस. राठोड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी हे करीत आहेत.