शेतीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:03+5:302021-06-05T04:25:03+5:30

बीड : केज शिवारातील शेतजमिनीच्या वादातून भावकीत वाद झाला. यावेळी एकमेकांना मारहाण झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी ...

Fighting over agricultural disputes | शेतीच्या वादातून हाणामारी

शेतीच्या वादातून हाणामारी

बीड : केज शिवारातील शेतजमिनीच्या वादातून भावकीत वाद झाला. यावेळी एकमेकांना मारहाण झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येथील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात २ जूनला घडली होती.

पहिल्या घटनेत विनोद ज्ञानोबा शिंदे यांच्या फिर्यादीवरून सागर गणेश डिकोळे हा शेतात लघुशंकेला बसला होता. यावेळी तू याठिकाणी असे कृत्य करू नकोस. शेतात महिला असतात असे म्हटल्याचा राग आल्याच्या कारणातून त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अमोल संजय शिंदे, सागर डिकोळे, संदीप शामराव शिंदे, सागर संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तर, दुसऱ्या घटनेत संदीप शामराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून त्यांना व त्यांच्या पुतण्यास आमचे शेत खाल्ले अशी भांडणाची कुरापत काढून गंभीर मारहाण केली. याप्रकरणी केज ठाण्यात प्रमोद ज्ञानोबा शिंदे, विनोद ज्ञानोबा शिंदे, प्रशांत प्रमोद शिंदे, प्रवीण ज्ञानोबा शिंदे, अभिजित अनिल सत्वधर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास महिला पोलीस नाईक पाचपिंडे या करत आहेत.

Web Title: Fighting over agricultural disputes