क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST2021-08-29T04:32:41+5:302021-08-29T04:32:41+5:30

गेवराई : विनाकारण शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना चाकू व लाकडी दांड्याने मारहाण केली. शहरातील ...

Fighting between two groups for trivial reasons | क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत हाणामारी

क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत हाणामारी

गेवराई :

विनाकारण शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना चाकू व लाकडी दांड्याने मारहाण केली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयानजीक २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दरम्यान दुसऱ्या गटानेही फिर्याद दिली. दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हा नोंद झाला.

सय्यद जावेद (रा.साठेनगर,गेवराई) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सय्यद व त्यांचा टेम्पो मालक टेम्पो पाॅईंटजवळ थांबलेले होते. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ सुरु केली, तेव्हा सय्यदने याचा जाब विचारला,यावर आरोपी शेख शाकीर शेख मंजूर अहमद याने ‘तू माझ्या भाडेवाल्याला फोन का लावलास’ असे म्हणत त्याच्या भावाला बोलावून घेतले. यावेळी फिरोज मंजर अहमद याने सय्यदच्या मनगटावर चाकू मारला,तर मक्तार अल्लाउद्दीन इनामदार याने लाकडी दांडे डोक्यात मारले. अन्य एकाने लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावरुन चौघांवर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, शेख फेरोज शेख मंजूर यांनीही फिर्याद दिली. दारुच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्याचे नाव भावाला सांगत असतानाच आरोपीसह त्याच्या इतर तीन साथीदारांनी गज व काठीने मारहाण केली. त्यावरुन आरोपी सय्यद जावेद, सय्यद सोहेल,अब्दुल माजेद व सय्यद इम्रान (सर्व रा.गेवराई) यांच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

------

Web Title: Fighting between two groups for trivial reasons