प्रकल्पग्रस्त कृती समितीचे परळीत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:08 IST2018-02-27T00:07:58+5:302018-02-27T00:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे बंद केलेले प्रशिक्षण त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी येथील औष्णिक ...

प्रकल्पग्रस्त कृती समितीचे परळीत उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे बंद केलेले प्रशिक्षण त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालयासमोर सोमवारपासून प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले.
औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्त गेल्या ५ वर्षांपासून प्रगत कुशल प्रशिक्षण घेत आहोत. कोणत्याही प्रकारची लेखी/मौखिक सूचना देता २८ आॅक्टोबर २०१७ पासून त्यांचे प्रशिक्षण बंद केले.
२०१२ मध्ये विद्युत केंद्राने सर्व्हे नं. २३२, २३८, २३९ व २४० गट संपादित करून त्यावर अंतिम आॅवार्ड तयार केलेला आहे. त्यानुषंगाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, अंतिम अॅवॉर्ड प्रत, मूळ नोटीस ९/३, १२/३ ची नोटीस हे सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.
जिल्हाधिका-यांनी उपरोक्त आॅवार्ड व नोटिसा तपासून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जारी केलेले आहे. याचे नाहरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) सुध्दा औष्णिक विद्युत केंद्राकडे पाठवलेले आहे.
पुन्हा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून त्वरित सामावून घेण्यासाठी हे उपोषण सुरु केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश रामकृष्ण बिडगर, उपाध्यक्ष अमित रूस्तुमराव केंद्रे, सचिव व्यंकट अंगद बिडगर यांच्यासह प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या पदाधिका-यांनी कळविले आहे.