बनसारोळा येथील गायरानधारकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST2021-08-15T04:35:26+5:302021-08-15T04:35:26+5:30
बनसारोळा येथील गायरानधारक गेल्या ४० वर्षांपासून गायरान जमिनी कसून खात आहेत. गट नं.१७ मधील सरकारी गायरान अतिक्रमणधारकांच्या नावे ...

बनसारोळा येथील गायरानधारकांचे उपोषण
बनसारोळा येथील गायरानधारक गेल्या ४० वर्षांपासून गायरान जमिनी कसून खात आहेत. गट नं.१७ मधील सरकारी गायरान अतिक्रमणधारकांच्या नावे तत्काळ नियमानुकूल कराव्यात. गायरान अतिक्रमणधारकांच्या १-ई ला नोंदी घ्याव्यात. गायरानधारकांना ग्रामपंचायतीच्या केवळ ठरावाच्या प्रमाणपत्राच्या आधारे पीकविमा, पीक कर्ज अल्पभूधारक योजनेचा लाभ देण्यात यावा, या विविध मागण्यांसाठी गायरानधारक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणात उषा नवगिरे, नंदाबाई जोगदंड, सुशीला गायकवाड, राधा जोगदंड, सुनंदा जोगदंड, राम गायकवाड, व्यंकट जोगदंड, माणिक जोगदंड व गायरान हक्क अभियानाचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. विलास लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर जोगदंड, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संजय तेलंग, गोविंद मस्के, उमेश शिंदे, रमेश कोळी सहभागी झाले आहेत.
140821\img-20210814-wa0092.jpg
बनसारोळा येथील गायरानधारक उपोषणास बसले आहेत