वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:27+5:302021-09-06T04:37:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...

Farming needs time to adapt to climate change | वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरणातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा. लि.या कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील मुरलीधरन यांनी केले.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित व होगनास इंडिया प्रा. लि.च्या अर्थसाहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत दुरुस्त केला आहे. या पाझर तलावाचे शनिवारी झालेल्या जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधरन बोलत होते. कंपनीचे संचालक डॉ. शरद मगर अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापक सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष गुंड, वाघळूजचे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, डॉ. अनिल गुंड, ॲड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव उपस्थित होते.

कंपनीच्या अर्थसाहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावाची दुरुस्ती, २५०० आंबा झाडे लागवड, सार्वजनिक जागेत वृक्षारोपण ही कामे केली आहेत. यावेळी डॉ. अनिल गुंड, जालिंदर गुंड, माजी सभापती संतोष गुंड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, संदीप बालवे, संतोष ठोंबरे, भगवान राऊत, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच अजय गुंड यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

050921\img-20210905-wa0214_9.jpg

आष्टी तालुक्याीतील वाघळूज तलावाचे जलपूजन करताना सुनील मुरलीधरण

Web Title: Farming needs time to adapt to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.